अनिल कपूर अन् हर्षवर्धन यांचा चित्रपट
बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता अनिल कपूर स्वतःचा पुत्र हर्षवर्धनसाब्sात थार या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. आता हा चित्रपट 6 मे रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
चित्रपटाच्या प्रदर्शनाची माहिती नेटफ्लिक्स ऑफ इंडियाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत दिली आहे. वाळूच्या महालांमध्ये लपलेली असतात रहस्यं असे नेटफ्लिक्सने स्वतःच्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.
सस्पेन्स, रोमांच आणि रहस्याने भरपूर या चित्रपटाची कहाणी 80 च्या दशकावर आधारित आहे. या चित्रपटाचा बहुतांश हिस्सा राजस्थानात चित्रित करण्यात आला आहे. थारमध्ये हर्षवर्धनने सिद्धार्थ ही व्यक्तिरेखा साकारली आहे. काम शोधण्यासाठी राजस्थानच्या पुष्कर येथे पोहोचलेला आणि तेथूनच भूतकाळातील घटनांचा सूड उगवू पाहणाऱया युवकाची ही कहाण आहे. राज सिंह चौधरी यांच्या दिग्दर्शनात तयार थार हा रिव्हेंज-नोइर थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटाची निर्मिती अनिल कपूर फिल्म कंपनीच्या बॅनर अंतर्गत करण्यात आली आहे. चित्रपटात फातिमा सना शेख आणि सतीश कौशिक देखील मुख्य भूमिकांमध्ये दिसून येतील.