पेडणे (प्रतिनिधी ) पिंपळवाडा चॕपल जवळ हसापूर येथे पार्क करुन ठेवलेली थार ही महिद्रा कंपनीची जीप गाडी मंगळवारी दि.14 रोजी राञी उशीरा अज्ञात व्यक्तीने जाळल्याची लेखी तक्रार पेडणे पोलीस स्थानकात विरेश बोरकर या जीप मालकाने दिली असल्याची माहिती पेडणे पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक विवेक हळर्णकर यांनी दिली.
ही जीप गाडी हसापूर येथील आलेक्स डिसोझा या आपल्या मिञाला दिली होती. या गाडीचा क्रमांक जी.ए.07 यु. 8899 असून ही गाडी नेवरा येथील आहे. पेडणे पोलिसांच्या पीसीआरला या संबंधीची माहिती मिळताच पीसीआर गाडी घटना स्थळी गेली. पेडणे अग्निशामन दलाला राञी 12.15 च्या दरम्यान गाडीला आग लावल्याचा कळविल्यानंतर पेडणे आग्निशमन दलाच्या जवानानी घटनास्थळी जाऊन आग विझविली माञ तोपर्यंत जीप पूर्णपणे जळून खाक झाली होती.
ड़ खास सूञांकडून मिळालेल्या माहिती नुसार या जीप गाडीतून रिव्होल्युशनरी आॕफ गोवन्स या संघटनेचा एक कार्यकर्ता हसापूर येथे आपल्या मिञाकडे आला होता. त्याचा राग काढून एका व्यक्तीने या गाडीला आग लावली असल्याची चर्चा आहे.
ड़पेडणे पोलिसांच्या या जीप गाडी चाळणा-या व्यक्तीचा शोध घेऊन त्याला अटक करण्याचे मोठे आव्हान असून पेडणे पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष लागून आहे.