बर्लिन
स्पेनचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा फुटबॉलपटू थिएगो अलकांटरा आता प्रिमीयर लिग चॅम्पियन्स विजेत्या लिव्हरपूल संघात दाखल होणार आहे. थिएगो अलकांटरा यापूर्वी बायर्न म्युनीच संघाचे प्रतिनिधीत्व करीत होता.
बायर्न म्युनिच फुटबॉल क्लबने अलकांटरा बरोबरच्या करारात वाढ करण्याच्या निर्णयाला विलंब केल्याने अलकांटराने लिव्हरपूल फुटबॉल क्लबशी नवा करार करण्याचे निश्चित केले. लवकरच तो या क्लबच्या करारावर स्वाक्षरी करणार असल्याचे लिव्हरपूलचे व्यवस्थापक जर्गेन क्लॉप यांनी सांगितले. त्याच्च्या शानदार कामगिरीच्या जोरावर गेल्या फुटबॉल हंगामात बायर्न म्युनीचने बुंदेस्लीगा फुटबॉल स्पर्धा आणि जर्मन चषक फुटबॉल स्पर्धा जिंकली होती. 2013 साली 29 वर्षीय अलकांटरा बायर्न म्युनीचमध्ये दाखल झाला होता. त्याने या संघाकडून 231 सामन्यात 31 गोल नोंदविले आहेत.