वार्ताहर / थिवी
माडेल थिवी येथे ट्रक आणि स्कूटर यांच्यामध्ये झालेल्या अपघातात स्कूटर चालक फ्रन्सिस डिसोझा (45) हा जागीच ठार झाला. हा अपघात सकाळी झाला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार फ्रान्सिस आपल्या ऍक्टीव्हा स्कूटर जीए-03 एजे-6602 ने जात असता त्याच्या मागोमाग ट्रक क्र. जीए-04टी- 2730 येत असता त्याने स्कूटर चालक फ्रान्सिस यांना धडक दिली असता ट्रकचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला व ते जागीच ठार झाले. घटनेची माहिती म्हापसा पोलिसांना दिल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. व मृतदेह उत्तर तपासणीसाठी जिल्हा आझिलो इस्पितळात पाठवून दिला.