सास युनिकॉमर्सच्या ई कॉमर्स टेडर्स 2020चा अहवाल सादर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोना महामारीच्या कारणामुळे ज्यास्तीत जास्त ग्राहकांचा कल हा ऑनलाईन खरेदीकडे वळल्याचे पहायावस मिळाले आहे. यासंदर्भातील माहितीवर आधारीत सास कंपनी युनिकॉमर्सच्या ई कॉमर्स टेडर्स 2020चा अहवाल सादर करण्यात आला आहे. यामध्ये कोविड19 मुळे ग्राहकांचा ऑनलाईन खरेदीकडे कल वाढत गेल्याची नोंद करण्यात असून यातूनच अनेक नवनवीन ब्रँड थेट ग्राहकांपर्यंत पोहोचल्याची माहिती असून यांच्यासाठी सदर कंपन्यांनी आपली स्वतःहाची वेबसाईट सादर केली आहे.
थेट ग्राहकांपर्यंत आपली सेवा पोहोचविण्यामध्ये प्रामुख्याने ई कॉमर्स क्षेत्रात लॉकडाऊनच्या अगोदरच्या तुलनेत जादा विक्री झाली आहे. जून 2020 च्यानंतर ऑर्डर्समध्ये 17 टक्क्मयांची वृद्धी नोंदवली आहे. ग्राहकांचा खरेदीचा कलही बदलत गेल्याचे दिसून आले आहे. यात आरोग्य आणि औषध, एफएमसीजी आणि शेती संबंधीत उत्पादनांची मागणी वाढल्याचे सांगितले आहे.
प्रथम शॉपिंगची संख्या तेजीत
ई कॉमर्स नव्याने सुरु करण्यात आल्यापासून रिटर्न रेटचा दर 30 टक्क्मयांनी घरसला आहे. यात नवीन सुरक्षा नियम, आवश्यक उत्पादनांची मागणी आणि पहिल्यादाच खरेदी करणाऱयांची संख्या ही थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यास वेगाने यशस्वी झाल्याने प्रथम शॉपिंग करणाऱयांची संख्या तेजीत राहिल्याची नोंद केली आहे.
ब्रँड थेट घरापर्यंत
भारतामधील ई कॉमर्स क्षेत्र वेगाने बदल घेत आहे. यामध्ये सध्या ब्रॅड ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचविण्याचे अतिशय वेगाने प्राप्त होत आहे. या कामासाठी ब्रँडस आपली स्वतःहाची वेबसाईट बनवत आहेत, दुसऱयाबाजूला ब्रँडला मार्केट उपलब्ध करुन देण्यासाठी रचना आखली जाते. यातून ग्राहक जोडणीवर भर दिला जात असल्याचे स्पष्ट केले
आहे.