आरोग्य मंत्री राजीनामा द्या; चिदंबरम यांची मागणी
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली
देशात वाढत असलेल्या कोरोना लाटेमुळे केंद्र सरकारावर जगभरातुन टीक होत आहे. जगभरातील विकसीत राष्ट्राच्या प्रसारमाध्यमांनी मोदी सरकारला फटकारल आहे. यातच भर म्हणुन जगप्रसिद्ध संशोधन पत्रिका ‘द लॅन्सेट’ने कोरोना परिस्थितीत हाताळण्यात मोदी सरकार अपयशी ठरल्याचं सांगत मोदी सरकारच्या कारभारावर बोट ठेवले आहे.
त्यावरुन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी मोदी सरकारला चांगलेच खडे बोल सुनावले आहेत. चिदंबरम यांनी ट्विट करत कोरोनासंदर्भात केंद्र सरकारने थोडी जरी शिल्लक असेल तरी आपले अपयश मान्य करत देशाची जाहीर माफी मागावी आणि जबाबदारी स्विकारत केंद्रीय आरोग्य मंत्र्याने मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.
‘द लॅन्सेट’ हे एक जगप्रसिद्ध संशोधन पत्रिका आहे. त्यांनी लिहील आहे की भारतात 4 मे रोजी 2 कोटीपेक्षा अधिक लोकांना कोरोना झाला आहे . प्रतिदिन भारतात साधारणतः 3 लाख 78 हजार नव्या कोरोना रुग्णांची नोंद होते. याशिवाय आतापर्यंत सुमारे 2 लाख रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णालयं फुल्ल आहेत. वैद्यकीय कर्मचारी थकले असून त्यातील अनेकांना कोरोना संसर्ग झाला आहे. असे ही या संशोधन पत्रिकेत भारताच्या स्थितीचे वास्तवादी वर्णन केलं आहे.