केंद्रीय मंत्रिमंडळाची अर्थसंकल्पाला मंजूरी
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन थोडय़ाच वेळात लोकसभेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मोदी सरकारच्या काळातील हा दुसरा अर्थसंकल्प असून, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वात झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अर्थसंकल्पाला मंजूरी मिळाली असून, अर्थमंत्री सीतारामन काही मिनिटातच अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
देशात सध्या मंदी आणि बेरोजगारीची मोठी समस्या भेडसावत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला या अर्थसंकल्पातून मोठय़ा आशा आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेवर असलेले सध्याचे मंदीचे मळभ दूर करण्याचे आव्हान अर्थमंत्र्यांसमोर असणार आहे. वैयक्तिक प्राप्तीकरात कपात, ग्रामीण व कृषी क्षेत्रासाठी सवलती आदी बाबींचा समावेश आहे.
या वित्तीय वर्षात अर्थव्यवस्थेत सध्या आर्थिक विकासाचा दर 6 ते 6.5 टक्के राहण्याचा अंदाज आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मागील काही कार्यक्रमांमध्ये इन्कम टॅक्सच्या रेटमध्ये कपात करण्याचे संकेतही दिले होते. त्यामुळे इन्कम टॅक्समध्येही दिलासा मिळण्याची शक्यता आहे.