प्रतिनिधी /बेळगाव
जयदे डेंटल क्लिनिक हुबळी येथे डॉ. गौतम आर. जयदे आणि त्यांच्या टीमने थ्रीडी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून जबडय़ावर शस्त्रक्रिया केली. अशा प्रकारची ही पहिलीच शस्त्रक्रिया केली.
लहान मुलाच्या हनुवटीला झालेल्या दुखापतीमुळे तीचा चेहरा वेडावाकडा झाला होता. डॉ. गौतम यांनी शस्त्रक्रिया करण्यासाठी तिच्या दोन्ही बाजुंच्या जबडय़ांचे सांधे, पेशंट स्पेसिफिक इम्प्लांट्स द्वारे थ्री डी तंत्र वापरून डिझाईन केले आहे.
चेहऱयावरील स्नायुंची वेडीवाकडी रचना सुधारणे हे अनेकदा एक मोठे आव्हान असते आणि त्यासाठी बहुविध कौशल्याचा आधार घ्यावा लागतो. संयुक्त पुनर्रचनेसह जबडा सुधारण्यासाठी सॉफ्टवेअर आधारित डिजिटल प्लॅनिंग आणि सीएडी सीएएम तंत्रज्ञानाचा वापर हा एक आधुनिक पर्याय आहे. ज्याचा डॉक्टरांच्या पथकाने उपयोग करून घेतला.
या शस्त्रक्रियेमुळे सदर मुलगी आता तिचे तोंड पूर्णपणे उघडू शकते. शिवाय तीला अन्न ग्रहण करणे सोपे जात आहे. अशी माहिती गौतम जयदे यांनी दिली.