बीजिंग
मागील काही दिवसांपूर्वी चीनच्या नियामकद्वारा चीनमधील दिग्गज कंपनी अलिबाबा समूहावर जवळपास 21,000 कोटी रुपयाची दंड आकारणी केली होती. यामध्ये मीडियामध्ये ई-कॉमर्स कंपनीच्या वाढत्या प्रभावामुळे चिनी अधिकारी मोठय़ा प्रमाणात गोंधळात पडले असल्याची माहिती आहे. निक्की आशियाच्या माहितीनुसार अलिबाबाच्या आपल्या ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म ताओबाओ आणि तमाल याच्यासाठी अधिक करुन ओळखले जाते. परंतु हाँगझाऊमध्ये कंपनीने आपले मीडिया साम्राज्य उभारले आहे. चिनी नियामकांनी म्हटल्याप्रमाणे अलिबाबा समूहाने एकाधिकार विरोधी नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. यासोबतच या बाजारात आपल्या प्लॅटफॉर्मचा दुरुपयोग केल्याचेही म्हटले गेले आहे. अलिबाबा समूहावर मोठय़ा रक्कमेच्या दंडाची आकारणी करुनही बाजारातील कंपनीचा प्रभाव कमी न होता तो वाढत जात असल्याचे समजते.