प्रतिनिधी/ बेळगाव
बाजार गल्ली, वडगाव येथील दक्षिणमुखी मारुतीला रुद्राभिषेक पूजा, पंचाभिषेक पूजा, कुंकुमार्चन, शेंदूर, तेलपान या पाच प्रकारच्या पूजा करण्यात आल्या. त्यानंतर पौष महिन्यातील मानसपूजन रुईच्या पानांवर लिहिलेला हार पझारी बद्रीनाथ कुलकर्णी यांनी घालून आरती व पूजा केली. यावेळी पंच कमिटीचे अध्यक्ष सुरेश दामोदार पिळणकर, राजू कुबसद, वैजनाथ उच्चुकर उपस्थित होते. सर्व भाविकांना तीर्थप्रसाद देण्यात आला.