बेळगाव :वडगाव येथील दक्षिणमुखी मारुतीला रविवारी सकाळी केसरयुक्त पंचाभिषेक केला. यावेळी देशावर आलेले कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी शिवरक्षा जप, हनुमान-स्तवन, संकटमोचक हनुमानाष्टक जप आदी धार्मिक विधी पुजारी बद्रिनाथ कुलकर्णी यांनी पार पाडले. तसेच रुईच्या पानांचा रामनाम जपाचा हार मारुतीला अर्पण करून गाऱहाणे घालण्यात आले. ‘विश्वाचा विश्राम रे, बलभीम माझा स्वामी रे, या मारुतीने कोरोना हटवावा रे’ असा संकल्प पानांवर सोडण्यात आला. त्यानंतर आरती व पूजा करण्यात आली. सर्वांना तीर्थप्रसाद देण्यात आला. यावेळी मंदिराचे सदस्य व ट्रस्टी हजर होते.
Previous Articleबेळगाव वन कार्यालयांतील कामे ठप्प
Next Article रुक्मिणी नगरमधील रस्ता बनला धोकादायक
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.