वृत्तसंस्था/ जोहान्सबर्ग
दक्षिण आफ्रिकेचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा फुटबॉलपटू एम.मदिशाचे शनिवारी मोटार अपघातात निधन झाले. दक्षिण आफ्रिकेच्या फुटबॉल संघटनेतर्फे ही बातमी प्रसिद्ध करण्यात आली.
शनिवारी जोहान्सबर्गमध्ये 25 वर्षीय मदिशा आपल्या मित्रासमवेत मोटारीतून जात असताना त्यांच्या वाहनाने जाहिरातीच्या प्रचंड आकाराच्या फलकाला धडक दिली. काही क्षणातच मोटारीने पेट घेतला आणि संपूर्ण मोटार जळून खाक झाली. या अपघातात फुटबॉलपटू मदिशा व त्याचा मित्र ठार झाले. दक्षिण अफ्रिकेच्या फुटबॉल संघटनेतर्फे त्याला श्रद्धांजली वाहण्यात आली.