वृत्तसंस्था/ पोर्ट एलिझाबेथ
यजमान दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱया कसोटीला येथील सेंट जॉर्ज पार्क मैदानावर गुरूवारपासून प्रारंभ होत आहे. या कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा संघ आपले भवितव्य बदलण्यासाठी प्रयत्न करेल.
या मैदानावर यापूर्वी सहा कसोटी सामने खेळविले गेले आहेत. याच मैदानावर दक्षिण आफ्रिकेने आपली पहिली कसोटी इंग्लंडविरूद्ध 1888-89 साली खेळली होती. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डु प्लेसिस याने 72.71 धावांच्या सरासरीने 509 धावा जमविताना दोन शतके झळकविली होती. डु प्लेसिसने आतापर्यंत कसोटीत 9 शतके नोंदविली आहेत पण अलिकडे डु प्लेसिस फलंदाजीचा सूर मिळविण्यासाठी झगडत आहे. विश्व कसोटी चॅम्पियन्सशीप मालिकेतील चार सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरी राखली आहे. कसोटीतील गेल्या सात डावामध्ये डु प्लेसिसने सर्वाधिक म्हणजे 29 धावा जमविल्या आहेत. दक्षिण आ फ्रिकेचा संघ सध्या बॅडपॅचमधून जात आहे. त्यानी आतापर्यंत सलग पाच सामने गमविले आहेत. रूटच्या नेतृत्वाखाली इंग्लंड संघाने या मालिकेतील दुसरी कसोटी 189 धावांनी जिंकून दक्षिण आफ्रिकेशी 1-1 अशी बरोबरी साधली आहे. आता या तिसऱया सामन्यात नाणेफेक आणि नाशिबाची साथ मिळविण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ आशावादी आहे. डु प्लेसिसच्या नेतृत्वाखाली दोन वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाविरूद्धची कसोटी मालिका जिंकली होती. डु प्लेसिसच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेने 23 कसोटी सामन्यापैकी 15 सामने जिंकले असून पाच सामने गमविले आहेत. इंग्लंडचा संघ या मालिकेत आघाडी घेण्यासाठी प्रयत्न करेल.