वृत्तसंस्था/ जोहान्सबर्ग
येत्या सप्टेंबर महिन्यात दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट संघ लंकेचा दौरा करणार आहे. या दौऱयात तीन सामन्यांची वनडे मालिका आणि तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळविली जाणार आहे.
दक्षिण आफ्रिकेचा हा लंका दौरा 2 ते 14 सप्टेंबर दरम्यान राहील. दोन्ही देशांच्या क्रिकेट मंडळाने या दौऱयाला अधिकृत मान्यता दिली आहे. येत्या ऑक्टोबरमध्ये संयुक्त अरब अमिरातमध्ये होणाऱया टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या दृष्टीकोनातून सरावाकरिता हा दौरा आयोजित केला आहे. उभय संघातील दोन्ही मालिकातील सामने कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर खेळविले जातील, अशी माहिती लंकन क्रिकेट मंडळाच्या प्रवक्त्याने दिली.