वृत्तसंस्था/ जोहान्सबर्ग
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा आगामी विंडीजचा दौरा बेमुदत कालावधीसाठी स्थगित करण्याचा निर्णय क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने घेतला आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धा सप्टेंबर महिन्यात घेतली जाणार असून या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचे बरेच क्रिकेटपटू सहभागी होत आहेत. दरम्यान, नोव्हेंबर महिन्यापर्यंत दक्षिण आफ्रिका संघातील खेळाडू या दौऱयासाठी उपलब्ध राहू शकणार नाहीत. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा नियोजित विंडीज दौरा बेमुदत कालावधीसाठी स्थगित केल्याची घोषणा क्रिकेट दक्षिण आफ्रिकेचे संचालक ग्रीम स्मिथने केली आहे.
येत्या सप्टेंबर महिन्यात दक्षिण आफ्रिका आणि विंडीज यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका किंवा पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळविण्यासाठी क्रिकेट विंडीज आशावादी होते. पण क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने ही शक्मयता फेटाळून लावल्याने आता हा दौरा बेमुदत कालावधीसाठी लांबणीवर टाकला जाईल, अशी आशा क्रिकेट विंडीजचे प्रमुख कार्यकारी जॉनी ग्रेव्ह यांनी व्यक्त केली. शनिवारी ग्रेव्ह यांनी दक्षिण आफ्रिकेचा हा दौरा लांबणीवर अधिकृत घोषणा केली. पुढील वषीच्या जानेवारी ते मार्च दरम्यान दक्षिण आफ्रिकेचा संघ आयसीसीच्या वेळापत्रकानुसार पाक, लंका आणि ऑस्ट्रेलिया या संघांविरुद्ध कसोटी सामने खेळणार आहे.