वृत्तसंस्था/ केपटाऊन
दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यात वनडे क्रिकेट मालिका 27 नोव्हेंबरपासून खेळविली जाणार आहे. या मालिकेपूर्वी क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने आपल्या संघातील सर्व खेळाडूंची पहिली कोरोना चांचणी घेण्यात आली. या चांचणीमध्ये दक्षिण आफ्रिका संघातील तीन क्रिकेटपटू पॉझिटिव्ह असल्याने त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेतर्फे या क्रिकेटपटूंची नावे मात्र गुपीत ठेवली आहेत.
इंग्लंडचा संघ दक्षिण आफ्रिकेत दाखल झाला असून या संघाने आपल्या सरावाला प्रारंभ केला आहे. दरम्यान दक्षिण आफ्रिका दौऱयामध्ये इंग्लंडचा पहिला सामना केपटाऊनमध्ये शनिवारी होत आहे. या सामन्यापूर्वी दक्षिण अफ्रिकेच्या सर्व क्रिकेटपटूंची पहिली कोरोना चांचणी घेण्यात आली. या चांचणीत तीन क्रिकेटपटू पॉझिटिव्ह असून त्यांना केपटाऊनमध्ये तातडीने आयसोलेशनमध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणे क्रिकेट दक्षिण आफ्रिकेच्या वैद्यकीय पथकाचे या खेळाडूवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात वनडे आणि टी-20 मालिका खेळविल्या जाणार असून एकूण सहा सामने आयोजित केले आहेत. या मालिकेसाठी क्रिकेट दक्षिण आफ्रिकेकडून बदली खेळाडू जाहीर केलेले नाहीत.