वृत्तसंस्था/ ग्रोस आयलेट
येथे सुरू असलेल्या दुसऱया आणि शेवटच्या कसोटीवर दक्षिण आफ्रिकेने खेळाच्या दुसऱया दिवसांअखेर आपले पूर्ण वर्चस्व राखले आहे. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 149 धावांची विंडीजवर भक्कम आघाडी मिळविली आहे. विंडीजचा पहिला डाव 149 धावांत आटोपला. तत्पूर्वी दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 298 धावांवर संपुष्टात आला. डि कॉकचे शतक चार धावांनी हुकले.
दोन सामन्यांच्या या कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिकेने पहिली कसोटी जिंकून विंडीजवर 1-0 अशी आघाडी मिळविली आहे. या दुसऱया कसोटीत दक्षिण आफ्रिकेने 5 बाद 218 या धावसंख्येवरून खेळाला पुढे सुरूवात केली आणि त्यांच्या शेवटच्या पाच फलंदाजांनी 80 धावांची भर घातली. दक्षिण आफ्रिकेच्या डावात डि कॉकने 162 चेंडूत 8 चौकारांसह 96 तर कर्णधार एल्गारने 8 चौकारांसह 77, व्हेरेनीने 2 चौकारांसह 27, रेबाडाने 3 चौकारांसह नाबाद 21, केशव महाराजने 12 धावा जमविल्या. विंडीजतर्फे रॉच आणि मेयर्स यांनी प्रत्येकी 3, गॅब्रियलने 2 तसेच सिलेस आणि होल्डरने यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
विंडीजच्या पहिल्या डावात ब्लॅकवूडने 6 चौकारांसह 49, शाय हॉपने 4 चौकारांसह 43, मेयर्सने 1 चौकारांसह 12, होल्डरने 2 चौकारांसह 10 धावा जमविल्या. 54 षटकांत विंडीजचा पहिला डाव 149 धावांत आटोपला. दक्षिण आफ्रिकेतर्फे मुल्डेरने केवळ एका धावेत 3 गडी बाद केले तसेच रेबाडा आणि एनिगीडीने तसेच केशव महाराज यांनी प्रत्येकी 2 बळी मिळविले. नॉत्जेने 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
दक्षिण आफ्रिका प. डाव 112.4 षटकांत सर्वबाद 298 (डि कॉक 96, मार्करेम 77, व्हेरेनी 27, रेबाडा नाबाद 21, केशव महाराज 12, रॉच 3-45, मेयर्स 3-28, गॅब्रियल 2-65, सिलेस 1-44, होल्डर 1-47)
विंडीज प. डाव- 54 षटकांत सर्वबाद 149 (ब्लॅकवूड 49, हॉप 43, मेयर्स 12, होल्डर 10, मुल्डेर 3-1, रेबाडा 2-24, एन्गेडी 2-27, केशव महाराज 2-47, नॉत्जे 1-41).