वृत्तसंस्था /जोहान्सबर्ग
दक्षिण आफ्रिकेचा संघ आगामी लंकेविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी येथे रविवारी एकत्रित आला. दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी संघातील सर्व क्रिकेटपटूंची कोरोना चाचणी घेण्यात आली आणि हे सर्वजण निगेटिव्ह असल्याचे क्रिकेट दक्षिण आफ्रिकेच्या प्रवक्त्याने सांगितले.
लंका आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिली कसोटी 26 डिसेंबरपासून सेंच्युरियन येथे खेळविली जाणार आहे. या कसोटीसाठी 17 जणांचा संघ शुक्रवारी निश्चित करण्यात आला. उभय संघामध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळविली जाणार आहे. दक्षिण आफ्रिकेचे दोन क्रिकेटपटू कोरोना चांचणीत पॉझिटिव्ह आढळल्याने त्यांनी या मालिकेतून माघार घेतली आहे. मात्र क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने कोरोना बाधित क्रिकेटपटूंची नावे जाहीर केलेली नाहीत.