वृत्तसंस्था/ गिक्वेबर्थ
दक्षिण आफ्रिकेचा 37 वर्षीय धावपटू स्टीफेन मोकोकाने 50 किमी. चालण्याच्या शर्यतीत नवा विश्वविश्वविक्रम केला. रविवारी झालेल्या या शर्यतीमध्ये मोकाकाने इथोपियाच्या बेकेलीचा विश्वविक्रम मागे टाकला.
मोकोकाने या शर्यतीमध्ये प्रथम स्थान मिळविताना दोन तास, 40 मिनिटे आणि 13 सेकंदाचा अवधी घेताना यापूर्वी इथोपियाच्या बेकेलीने गेल्यावर्षी याच शर्यतीमध्ये नोंदविलेला दोन तास, 42 मिनिटे आणि 07 सेकंदाचा विश्वविक्रम मोडीत काढला. रविवारी येथे झालेल्या शर्यतीमध्ये इथोपियाच्या ऍमेलीवर्क बोशोने पहिले स्थान मिळविताना तीन तास, 04 मिनिटे आणि 58 सेकंदाचा अवधी घेतला.