राष्ट्रपती सीरिल रामफोसा यांच्याकडून शोक व्यक्त
वृत्तसंस्था/ केपटाउन
नोबेल पुरस्कार विजेते दक्षिण आफ्रिपेचे आर्चबिशप राहिलेले डेसमंड टूटू यांचे निधन झाले आहे. देशाचे राष्ट्रपती सीरिल रामफोसा यांनी रविवारी शोक व्यक्त करत डेसमंड टूटू यांचा वयाच्या 90 व्या वर्षी मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. दक्षिण आफ्रिकेत वर्णभेदविरोधी प्रतीक म्हणून त्यांना ओळखले जात होते.
वर्णभेदाच्या अहिंसक विरोधासाठी 1984 मध्ये टूटू यांना नोबेल शांतता पुरस्काराने गौरविण्यात आले होते. 1990 च्या दशकाच्या अखेरीस टूटू यांना कर्करोगाची लागण झाल्याचे निदान झाले होते. अलिकडच्या काही वर्षांमध्ये त्यांना अनेकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
आर्चबिशप एमेरिटस डेसमंड टूटू यांचे निधन दक्षिण आफ्रिकेतील एका शूर पिढीचा अंत आहे, या पिढीने वर्णभेदाच्या विरोधात संघर्ष करत एक नवा दक्षिण आफ्रिका निर्माण केला आहे. टूटू यांनी स्वतःला बिगर-सांप्रदायिक, मानवाधिकारांचा युनिव्हर्सल चॅम्पियन यांनी म्हणून प्रस्थापित केले होते. राष्ट्रपती रामफोसा यांनी सांगितले.
आर्चबिशप डेसमंड टूटू यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही अतीव दुःख व्यक्त केले आहे. डेसमंड टूटू जागतिक स्तरावर असंख्य लोकांसाठी एक मार्गदर्शक होते. मानवी प्रतिष्ठा आणि समानतेसाठी दिलेल्या योगदानासाठी ते नेहमीच स्मरणात राहणार असल्याचे मोदींनी नमूद केले आहे.