ऑनलाईन टीम/तरुण भारत
कोरोनाच्या ‘ओमिक्रॉन’ या नव्या व्हेरिएंटने जगभरात दहशत निर्माण केली आहे. कुठल्याही विषाणूचे म्युटेशन होते. म्हणजेच परिवर्तनातून नवीन प्रकार तयार होतात. ओमिक्रॉन या असाच तयार झालेला व्हेरिएंट आहे. काही महिन्यांपूर्वी अशीच डेल्टा व्हेरिएंटने भीती निर्माण केली होती. आता ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर जगभरात खबरदारी घेतली जात आहे. ओमिक्रॉनची दक्षिण आफ्रिकेत उत्पत्ती झाली आहे. दक्षिण आफ्रिकेतून आतापर्यंत मुंबईत ८७ प्रवासी दाखल झाले आहेत. या ८७ जणांना ट्रेस केलं जातंय. अद्याप या ८७ जणांचे रिपोर्ट येणं बाकी आहे. कोविडच्या ओमिक्रॉन या विषाणूची लागण झालेला एकही रुग्ण अद्याप तरी आढळलेला नाही. या ८७ प्रवाशांचा अहवाल आल्यानंतर या बाबत स्पष्टता होणार आहे.
प्रथम दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉन चा रुग्ण सापडला आहे. दक्षिण आफ्रिकेतून आतापर्यंत मुंबईत ८७ प्रवासी दाखल झालेत. या ८७ जणांना ट्रेस केलं जातंय. अद्याप या ८७ जणांचे रिपोर्ट येणं बाकी आहे. कोविडच्या ओमिक्रॉन या विषाणूची लागण झालेला एकही रुग्ण अद्याप तरी आढळलेला नाही. या ८७ प्रवाशांचा अहवाल आल्यानंतर या बाबत स्पष्टता होणार आहे.