प्रतिनिधी / बेळगाव
आज हिंदू नववर्षानिमित्त श्री क्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर देवस्थान येथे पहाटे मंगलमय वातावरणात रुद्र अभिषेक व पंचांग पूजन करण्यात आले. त्यानंतर मंदिरामध्ये अध्यक्ष सुनील बाळेकुंद्री यांच्या हस्ते भव्य अशी गुढी उभारून पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करून लोणी पुजा व लोण्याची आरास करण्यात आली. संपूर्ण पौरोहित्य नागराज कट्टी यांनी केले.लोणी पूजेची आरास सचिन आनंदाचे गणेश देवर बसवनगोडा पाटील, राजू पाटील यांच्या सहकार्यातून पार पडली. यावेळी अध्यक्ष सुनील बाळेकुंद्री राजू भातकांडे, अभिजीत चव्हाण, राहुल कुरणे, विवेक पाटील, ज्योतिबा महेशी, दौलत जाधव, संजय मणगूतकर, विनायक मणगूतकर, कल्लाप्पा ज्योते सेवेकरी ट्रस्टी उपस्थित होते.