ऑनलाईन टीम / श्रीनगर :
दक्षिण काश्मीरमध्ये 24 तासांत झालेल्या तीन वेगवेगळय़ा चकमकीत सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अशरफ अहमद यांच्या हत्येत सहभागी असलेल्या आयएसजेकेचा दहशतवादी रफिक अहमद आणि इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाइस (आयईडी) तज्ञांसह पाच दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी ठार केले. शोपियांमध्ये ठार झालेले दोन दहशतवादी लष्कर-ए-तैयबाचे सदस्य होते. तर पुलवामा येथील त्रालमध्ये ठार झालेले दोन आयईडी तज्ञ अन्सार गजावत-उल-हिंदचे (एयूएच) सदस्य होते. त्यांच्याकडून चार एके रायफल्स, चार एके मॅगझिन आणि 32 काडतुसे जप्त करण्यात आली.
तत्पूर्वी, शुक्रवारी अनंतनागमधील बिजबिहारा येथे भाजपच्या पाच नेत्यांच्या हत्येत सहभागी असलेला हिजबुलचा दहशतवादी कुलगामचा रहिवासी शहजाद सेह याला सुरक्षा दलांनी ठार केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री उशिरा गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी अनंतनाग जिल्ह्यातील बिजबिहारा जिल्ह्यातील खुश रोई कलान येथे शोध मोहीम सुरू केली. आयएसजेके या दहशतवादी संघटनेचा दहशतवादी रफिक अहमद काल रात्री उशिरा ठार झाला. त्याचा 22 डिसेंबर रोजी एएसआय अशरफ अहमदच्या हत्येत त्याचा सहभाग होता. सुरक्षा दलांनी रात्री संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. या भागात आणखी काही दहशतवादी लपल्याची शक्मयता वर्तवण्यात आली आहे.