सोल : दक्षिण कोरिया या आर्थिक दृष्टय़ा सुसंपन्न देशात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. मंगळवारी दिवसभरात 40 नवे रूग्ण आढळून आले. त्यामुळे सरकारने काही भागात निर्बंध अधिक कठोर केले. नव्या रूग्णांपैकी 25 विदेशी प्रवासी नागरीक आहेत. या देशात स्थानिक लोकांमध्ये कोरोनाचा संसर्ग अत्यल्प आहे. एकंदर मृतांची संख्या 296 आहे. विदेशी नागरीकांना या देशात आल्यानंतर 14 दिवसांच्या अनिवार्य विलगीकरणात पाठविले जाते. तसेच नागरीकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सरकारअंतर्गत विशेष कक्ष निर्माण करण्यात आला आहे. त्यामुळे नियंत्रणासाठी साहाय्य होत आहे.
इजिप्तची कारागृहे बाधित
कैरो : इजिप्त या देशातील बव्हंशी कारागृहे कोरोनाच्या संसर्गाच्या दृष्टीने धोकादायक बनली असल्याचे वृत्त आहे. आतापर्यंत 2 हजारांहून अधिक कैद्यांना बाधा झाली असून त्यापैकी 14 जणांचा मृत्यू झाला. मात्र 300 हून अधिक कैदी अत्यवस्थ स्थितीत असल्याचे संगण्यात येते. इजिप्त सरकारवर मृत्यूंची संख्या दडविल्याचा आरोप होत आहे. कारागृहांमधून कैद्यांनी गुप्तपण्sाs पाठविलेल्या पत्रांमधून स्थिती स्पष्ट होत आहे. कारागृहांमधील आरोग्य स्थिती दयनीय असून कोणत्याही मूलभूत सुविधा बाधितांना दिल्या जात असल्याचे स्पष्ट होत आहे. त्याम्gळे काही आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संस्थानी तक्रार केली आहे.