सोल
सैन्यप्रमुख जनरल एम.एम. नरवणे हे सोमवारी तीन दिवसीय दक्षिण कोरियाच्या दौऱयावर रवाना झाले आहेत. या दौऱयात द्विपक्षीय सैन्य सहकार्याचा विस्तार करण्याच्या पद्धतींवर ते दक्षिण कोरियाच्या सर्वोच्च संरक्षण अधिकाऱयांशी चर्चा करणार आहेत. भारताला सैन्यसामग्री आणि शस्त्रास्त्रांचा पुरवठा करणाऱया प्रमुख देशांमध्ये द. कोरियाचा समावेश आहे. राजधानी सोलमध्ये जनरल नरवणे हे तेथील संरक्षणमंत्री, सैन्यप्रमुख आणि जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफ यांना भेटतील. द्विपक्षीय संरक्षण संबंधांना चालना देण्याकरता सैन्यप्रमुख तेथील नेत्यांसोबत विचारविनिमय करणार आहेत.