चिनी सैन्य अवाप् : अमेरिकन लढाऊ विमानांची भरारी : वादग्रस्त सागरी भागात युद्धाभ्यासाद्वारे आव्हान
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
दक्षिण चीन समुद्रात अमेरिकेचा युद्धाभ्यास सुरू असून त्याचे नौदल जोरदार शक्तिप्रदर्शन करून ड्रगनला आव्हान देत आहे. चीनच्या धमकीनंतरही अमेरिकेच्या 11 लढाऊ विमानांनी दक्षिण चीन समुद्राच्या वादग्रस्त भागात एकाचवेळी उड्डाण केले आहे. या उड्डाणादरम्यान चीन केवळ पोकळ धमकी देत राहिला आहे. अमेरिकेच्या या आक्रमक कारवाईमुळे संतप्त चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने याला सामर्थ्याचे उघड प्रदर्शन ठरविले आहे.
अण्वस्त्रs वाहण्याची क्षमता असलेल्या अमेरिकेच्या बी-52एच बॉम्बवर्षक विमानासह 10 अन्य लढाऊ विमानांनी आणि टेहळणी विमानांनी रविवारी एकत्रितपणे दक्षिण चीन समुद्रावरून उड्डाण केले आहे. या सर्व विमानांनी निमित्ज या अमेरिकेच्या विमानवाहू युद्धनौकेवरून उड्डाण केले होते. युएसएस निमित्जसोबत युएसएस रोनाल्ड रीगन विमानवाहू युद्धनौकाही युद्धाभ्यासात सहभागी झाली आहे.
ग्लोबल टाईम्सची उडविली थट्टा
दक्षिण चीन समुद्रात अमेरिकेची विमानवाहू युद्धनौका तैनात करण्यात आल्यावर चीनच्या शासकीय प्रसारमाध्यमांनी दिलेल्या धमक्यांना अमेरिकेच्या नौदलाने थट्टेवारी घेतले आहे. चीनच्या ग्लोबल टाईम्सच्या धमकीवजा ट्विटला रीट्विट करत अमेरिकेच्या नौदलाने ‘तरीही आम्ही याच भागात आहोत’ अशी प्रतिक्रिया जोडली आहे. ग्लोबल टाईम्सने रविवारी चीनच्या क्षेपणास्त्रांचे छायाचित्रे ट्विट करत अमेरिकेला धमकाविले होते. चीनच्या अरेरावीला थेट सामोरे जाण्याचे पाऊल अमेरिकेने उचलले आहे.
चीनची आगपाखड
अमेरिकन बी-52एच बॉम्बवर्षक विमान आणि युद्धाभ्यास हा योगायोग नव्हे तर शक्तीचे खुले प्रदर्शन असल्याची टिप्पणी ग्लोबल टाईम्सने केली आहे. पेंटागॉनचे अण्वस्त्रs वाहून नेण्यास सक्षम असलेले बी-52एच बॉम्बवर्षक विमान ग्वाममध्ये तैनात करण्यात आले आहे.