प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना प्रादुर्भावामुळे शाळा उशिराने सुरू झाल्याने ‘शिक्षकांसमोर नवीन आक्हान’ उभे राहिले आहे. इयत्ता दहावीचा निकाल वाढावा यासाठी कसे नियोजन करावे, यासाठी दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळातर्फे शिक्षकांसाठी कार्यशाळेचे आयोजन केले होते. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष ऍड. राजाभाऊ पाटील होते.
फोरमचे अध्यक्ष व गोजगे हायस्कूलचे मुख्याध्यापक एस. व्ही. जाधव यांनी कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट केला. डॉ. दीपक देसाई, पी. पी. बेळगावकर यांनी विविध प्रतिमांचे पूजन केले. संस्थेचे सचिव प्रा. विक्रम पाटील यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन
झाले.
यावेळी निवृत्त प्राचार्य ए. बी. निर्मळकर, जोतिबा पाटील, सविता पवार, स्नेहल पाटील, के. जी. नाईक, वसंत पाटील, कामण्णावर यांच्यासह शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बैलूर हायस्कूलचे मुख्याध्यापक एस. डी. पाटील यांनी केले. तर ओलमणी हायस्कूलचे मुख्याध्यापक ए. जे. सावंत यांनी सर्वांचे आभार मानले.