प्रतिनिधी/ बेळगाव
कर्नाटक तायक्वांदो व कर्नाटक ऑलिंपिक असोसिएशन यांच्या मान्यतेनुसार दक्षिण भारत विभागिय तायक्वांदो स्पर्धेत बेळगावच्या राव अकादमीच्या तायक्वांदो संघाने घवघवीत यश संपादन केले.
सदर स्पर्धा बेंगळूर वेस्तर तायक्वांदो अकादमीने आयोजित केली होती. या स्पर्धेत महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगना, आंध्रप्रदेश, केरळ, तामिळनाडू राज्यातील 1400 हून अधिक तायक्वांदोपटूंनी भाग घेतला होता. विश्व तायक्वांदो कोविड सेफ्टी नियमानुसार तंत्रज्ञान व ऑनलाईन पद्धतीने स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत ज्युनियर व सबज्युनियर गटात कुमसे वरि÷ गटात स्वप्निल पाटीलने सुवर्ण, वैभव पाटीलने सुवर्ण, कॅडेट गटात श्रवण धामणेकरने सुवर्ण, त्रिवेणी बडकण्णावरने सुवर्ण, सबज्युनियर गटात श्रेयस मोदगेकरने सुवर्ण, जिया पुजारीने रौप्य, स्पिड किकिंग विभागात वरि÷ गटात स्वप्निल पाटीलने सुवर्ण, वैभव पाटीलने सुवर्ण, श्रवण धामणेकरने सुवर्ण, त्रिवेणी बडकण्णावरने सुवर्ण तर ज्युनियर गटात श्रेयस मोदगेकर, जिया पुजारी यांनी सुवर्णपदक पटकाविले. या क्रीडापटूंना आंतरराष्ट्रीय तायक्वांदो प्रशिक्षक मास्टर श्रीपाद रवी राव यांचे मार्गदर्शन लाभत आहे.