कोल्हापूर /प्रतिनिधी
कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या प्रचारसभेत दगडफेक झाली आहे असा दावा स्वतः चित्रा वाघ (Chitra wagh) आणि कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यावर बोलताना चित्रा वाघ यांनी ही निवडणूक विरोधकांनी विकासाच्या मुद्द्यावर लढवावी. प्रचार सभेत दगडफेक का करताय? हिंमत असेल तर समोर या. असे आव्हान विरोधकांना भाजप (BJP) नेत्या चित्रा वाघ यांनी दिले आहे. आज कोल्हापुरात (kolhapur) पत्रकार परिषदेत (press conference) त्या बोलत होत्या.
रविवारी संध्याकाळी आमची मुक्त सैनिक वसाहत (mukta sainik vasahat) येथे सभा सुरु होती. तिथे सभा सुरू असताना आमच्या सभेवर दगड फेक झाली असल्याचे चित्रा वाघ यांनी सांगितले. महाराष्ट्र राजकारणात अशा प्रकारच्या भ्याड हल्लयाचा निषेध करते. झालेला प्रकार हा आरोप नाही. तर सत्य आहे. असेही चित्रा वाघ म्हणाल्या. ही घटना निषेधाची घटना असून असा अनुभव मला पहिल्यांदाच आला. याबाबत आम्ही जिल्हा पोलीस प्रमुखांना भेटून याबाबत तक्रार देणार आहे, असेही चित्रा वाघ म्हणाल्या.
उत्तरमध्ये निवडणुकीच्या काळात दहशतीचे वातावरण आहे. लोकांना धमक्या दिल्या जात आहेत. आम्ही याला घाबरणार नाही. गृहराज्यमंत्री (State Home Minister) यांच्या या मतदारसंघात २०२१ चा सगळा पाढा वाचला आहे. या राज्याला आणखी दोन गृहमंत्री आहेत हे सांगायला लागत. हे दुर्दैव आहे. निष्क्रिय गृहराज्यमंत्री आहे. असा टोला देखील चित्रा वाघ यांनी लगावला.
काही दिवसांपूर्वी महिलांनी काढलेल्या रांगोळ्या पुसल्या गेल्या. काल दगडफेकीचा प्रकार झाला हे सगळे प्रकार निंदनीय आहेत, असेही चित्रा वाघ म्हणाल्या.