ऑनलाईन टीम/तरुण भारत
भाजपच्या (BJP) पायाखालची वाळू सरकल्याने नाही ते आरोप माझ्यावर होत आहेत. दगडफेक हा प्रकार पूर्वनियोजित आहे. भाजप नेत्यांनी महिलांचा केलेल्या अपमानाची सर भरून काढण्यासाठी हा प्रकार समोर आणला जात आहे. पण आम्ही काही संशीयितांची नावे पोलिसांना देतो. दगडफेक केल्यानंतर ते संशयित पंपावर गेले का, कदमवाडीत गेले? याची चौकशी पोलिसांनी करावी. तसेच या संपूर्ण प्रकारची तपासणी करण्यात यावी. मी स्वतः जिल्हा पोलीस प्रमुखांना सांगणार आहे, असे पालकमंत्री सतेज पाटील (satej patil) म्हणाले.
रविवारी मुक्त सैनिक वसाहत येथे भाजपचे उमेदवार सत्यजित कदम (satyajit kadam) यांच्या प्रचारार्थ मेळावा पार पडला. यावेळी भाजप नेत्या चित्रा वाघ उपस्थित होत्या. सभा सुरू असताना विरोधकांकडून दगडफेक झाली. असा आरोप चित्रा वाघ (Chitra wagh) यांनी केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना पालकमंत्री सतेज पाटील यांनी प्रत्त्युत्तर दिले आहे.
पाटील पुढे म्हणाले, येत्या काही दिवसांत अशा अनेक घटना घडत राहतील. त्यामुळे भाजपच्या नेत्यांना अधिकची सुरक्षा द्यावी, अशी सूचना मी जिल्हा पोलीस प्रमुखांना केली असल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.