ऑनलाइन टीम / पुणे :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन असताना मंदिरे बंद आहेत. त्यामुळे भाविकांना दर्शन घेता येत नाही. त्याकरीता पुण्यातील कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टने दत्तमंदिर व दत्त महाराजांच्या मूर्तीचे थ्री डी दर्शन घेण्याची सोय उपलब्ध करुन दिली आहे.
श्री दत्त महाराजांचे व्हर्च्युअल दर्शन गुरुवार म्हणजेेच आजपाासून https://my.matterport.com/show/?m=VtVHNMnHBAK या लिंकवरुन उपलब्ध आहे.
भाविकांनी या दर्शनाचा लाभ घेऊन घरात सुरक्षित रहावे, तसेच आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, ही सद्यस्थितीत आपली उपासना समजावी. या लिंकद्वारे व फेसबुकवरुन महाराजांचे दर्शन घेणे आता शक्य होणार असल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष अॅड.शिवराज कदम जहागिरदार यांनी सांगितले.