वार्ताहर/ कंग्राळी बुद्रुक
कंग्राळी बुद्रुक ग्राम पंचायतीतील वॉर्ड क्र. 3 मधून उभे असलेले माजी ग्रा. पं. अध्यक्ष दत्ता रामा पाटील यांना मतदारांचा भरघोस पाठिंबा मिळत असून मतदारांनी दत्ता पाटील यांना भरघोस मतांनी निवडून आणण्यासाठी निर्धार केला आहे.
वॉर्ड क्र. 3 मधील (दोन मधील) बाहेर गल्ली मराठी कॉलनीचा काही भाग भागात मोडतो. यावेळी पाटील यांनी मतदारांच्या घरोघरी जाऊन विजयी आशीर्वाद घेतला.
दत्ता पाटील यापूर्वी सलग दोन वेळा ग्राम पंचायतीवर निवडून आलेले आहेत. मागील पाच वर्षात अध्यक्षपदाची धुरा सांभाळत स्मार्ट व्हिलेज फंडातील निधीच्या माध्यमातून त्यांनी गावचा सर्वांगीण विकासासाठी हातभार लावला आहे.
आपली बहुमोल मते देऊन कंग्राळी बुद्रुक गावची शिल्लक कामे करून घेण्याची संधी देण्याची विनंती मतदारांना यावेळी करण्यात आली. यावेळी वॉर्डातील सर्व मतदारांनी एकमुखी पाठिंबा दिला आहे.