ऑनलाईन टीम / मुंबई :
देशात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. त्यातच आता बॉलिवूड सुपरस्टार अभिनेता सलमान खानचा ड्रायव्हर आणि दोन स्टाफला कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे स्वतः सलमान खान आयसोलेटमध्ये गेला आहे.
सलमान खान सध्या बिग बॉस-14 चे होस्ट करत होता. पण आयसोलेट असल्यामुळे पुढील शुटिंगचे काय करणार हा प्रश्न आहे? तसेच सलमानने नुकतीच ‘राधे’ सिनेमाचे शुटिंग पूर्ण केले आहे. या सिनेमांत त्याच्यासोबत अभिनेत्री दिशा पटानी देखील आहे.
लॉकडाऊनमध्ये सिनेसृष्टीची सगळीच काम थांबली होती. पण गेल्या दोन – तीन महिन्यात ही काम सर्व नियम पाळत सुरू झाली. पण अजूनही कोरोना पूर्णपणे गेला नसून संपूर्ण देशाला अजूनही कोरोनाची भीती आहे.
दरम्यान, बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय, आराध्या बच्चन, किरण कुमार, करीम मोरानी, आफताब शिवदासानी, तमन्ना भाटिया, चिरंजीवी आदी कलाकारांना कोरोनाची लागण झाली होती.