प्रतिनिधी/ मडगाव
कोलवा पोलीस स्थानकाच्या हृदीतून एका 46 वर्षीय महिला संशयित आरोपीला फसवणुकीच्या प्रकरणासंबंधी दमण पोलीस ताब्यात घेऊन दमणला गेले आहेत.
दमण येथे एक फसवणुकीचे प्रकरण घडले होते आणि त्या प्रकरणात कोलवा भागातील एका महिलेचा संशयित आरोपी म्हणून उल्लेख होता. कोलवा पोलिसांच्या साहाय्याने दमण पोलिसांनी या संशयित महिला आरोपीला ताब्यात घेतले आणि न्यायालयाच्या परवानगीने तिला दमणला नेले.