अंबानी, अझीम प्रेमजीसह अन्य अब्जावधीच्या संपत्तीत घट
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
चालू आठवडय़ातील अंतिम दिवशी शुक्रवारी शेअर बाजारात मोठय़ाप्रमाणात चढउत्ताराचे वातावरण राहल्याचे दिसून आले आहे. यामध्ये काही अब्जावधींना मोठे नुकसान तर काहीना लाभ झाला आहे. शुक्रवारी सकाळी बाजार सुरु होताच व्यवहार काही वेळ बंद ठेवण्यात आले होते. पुन्हा शेअर बाजार सुरु झाला व थोडय़ा वेळानंतर तो सावरला होता. यामध्ये मात्र गुंतवणूकदारांना जोरदार नुकसान झाले आहे. परंतु डी-मार्टचे मालक राधाकृष्ण दमानी हे एकटेच अब्जावधी भारतीय गुंतवणूकदार असे आहेत. की त्याना बाजार लाभदायक ठरला आहे. दुसरीकडे देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानीसह अन्य अब्जावधींना नुकसान सहन करावे लागले आहे.
डी-मार्ट सुपरमार्केट साखळीचे मालक राधाकृष्ण दमानी यांची शुक्रवारपर्यंत संपत्ती 10.1 अब्ज डॉलरने म्हणजे जवळपास 74 हजार कोटी रुपयावर राहिली आहे. चालू वर्षात त्यांच्या संपत्तीत एकूण तीन हजार कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. दुसरीकडे कच्चे तेल आणि शेअरबाजारातील उलथापालथीमुळे मुकेश अंबानी यांची संपत्ती 32 टक्क्यांनी घटली आहे. शुक्रवारपर्यंत रिलायन्स इंडस्ट्रीजची एकूण संपत्ती 295 हजार कोटी रुपयांनी म्हणजे आतापर्यंत रिलायन्स इंडस्ट्रीजला 137 कोटी रुपयाचे नुकसान झाल्याची नोंद केली आहे. जगात नुकसान झालेल्यामध्ये अंबानी पाचवे व्यक्ती ठरले आहेत.
नुकसानीमधील भारतीय
नुकसान झालेल्या भारतीयांच्या अब्जावधींमध्ये अंबानी यांच्यापाठोपाठ अझीम प्रेमजी 111 हजार कोटी, एचसीएलचे शिव नडार 99 हजार कोटी, कोटक महिंद्रा बँकेचे उदय कोटक 91 हजार कोटी आणि लक्ष्मी मित्तल 63 हजार कोटी रुपयांनी नुकसानीत राहिले असल्याची माहिती आहे. यासोबतच जगातील पहिल्या स्थानी 227 हजार कोटी रुपयाच्या नुकसानीसोबत अब्जावपत्ती बर्नार्ड अरनॉल्ट, दुसऱया स्थानी 172 हजार कोटीसोबत अमानिको ओर्टेगा नुकसानीत राहिले आहेत.