ऑनलाईन टीम / काबुल :
अफगाणिस्तानात तालिबानची दहशत कायम असून, अनेक प्रांतामध्ये महिला आणि मुलांवर अत्याचार होत आहेत. दयाकुंडी प्रांतातील खादिर जिल्ह्यात तालिबान्यांनी हजारा समाजातील 14 जणांची गोळ्या घालून हत्या केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामध्ये 14 सैनिक आणि 2 सर्वसामान्य नागरिकांचा समावेश आहे.
मानवाधिकार गट अम्नेस्टी इंटरनॅशनलने सांगितले की, नुकत्याच हाती आलेल्या अहवालानुसार, 4 ते 5 जुलै दरम्यान तालिबानने हजारा अल्पसंख्याकांच्या नऊ सदस्यांवर अत्याचार करून त्यांची हत्या केली. तसेच गझनी प्रांतातील त्यांची घरे लुटली. तर अन्य 6 हजारा लोकांना गोळ्या घालण्यात आल्या.