प्रतिनिधी/ सातारा
येथील राधिका चौकात मार्च महिन्यात पडलेल्या दरोडय़ातील सराईत गुन्हेगारास जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. आकाश संदीप साबळे (वय 23, रा. शिवथर (ता. जि. सातारा) असे जेरबंद करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव असून लॉकडाऊनलोड कालावधीमध्ये स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शाहुपुरी पोलीस ठाणे हद्दीत दि. 21 मार्च 2020 रोजी येथील राधिका चौकात दरोडा पडला होता. याप्रकरणी दरोडयातील आरोपी पकडण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाख्नेकडील पथके तयार करुन त्यांना शाहुपुरी पोलीस ठाणे यांचे हद्दीत राधिका चौक येथे पडलेल्या दरोडयातील आरोपींचा शोध घेवुन पकडण्याबाबत पथकास आदेश दिले. त्याप्रमाणे दि.16 मे 2020 रोजी दुपारी 2 वाजण्याचे सुमारास स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक सातारा शहरामध्ये लॉकडाऊनच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करित असताना पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी यांना गोपनीय बातमीदारामार्फत राधिका चौक येथे पडलेल्या दरोडयातील आरोपी हा बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील हॉटेल सुराज व्हेज येथे पार्किंगमध्ये येणार असल्याची माहिती मिळाली
त्याप्रमाणे सातारा शहरात पेट्रोलिंग करित असलेल्या पथकाने आरोपीस पकडण्यासाठी सापळा लावून संशयित आरोपी आकाश संदीप साबळे यास हॉटेल सुराज व्हेज च्या पार्किंगमध्ये पकडुन ताब्यात घेतली यानंतर त्यास पुढील कार्यवाहीसाठी शाहुपुरी पोलीस ठाणे यांचे ताब्यात देणेत आले आहे.
या कारवाईत पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांचे सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार जोतीराम बर्गे, पोलीस हवालदार तानाजी माने, मुबीन मुलाणी, पोलीस नाईक विजय कांबळे, शरद बेबले, प्रविण फडतरे, मुनीर मुल्ला, पोलीस कॉन्स्टेबल विशाल पवार, चालक पोलीस नाईक
गणेश कचरे यांनी सहभाग घेतला आहे.