मच्छे येथील तलावांची केली पाहणी
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव तालुक्मयात पाणी समस्या मिटविण्यासाठी मोठय़ा प्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहेत. सध्या मच्छे येथे सात तलावांची खोदाई उद्योग खात्रीतून करण्यात आली असून त्याची पाहणी जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही. यांनी केली आहे. त्यांनी या कामाची प्रशंसा केली असून यापुढेही अशीच कामे करत रहा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
विविध ठिकाणी उद्योग खात्रीची जोड देत तलावांची निर्मिती करून त्यामध्ये पाणीसाठा कसा होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्यात आले आहेत. तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी हे यासाठी धडपडत आहेत. पाण्यासाठी अनेक गावांमध्ये भटकंती करावी लागते. मात्र त्यावर उपाययोजना आणि जमिनीतील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी बेळगाव तालुक्मयात जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत. आता पुन्हा बेळगाव तालुक्मयात 42 तलावांची निर्मिती करून पाणी समस्या मिटविण्यासाठी आणि पाणी पातळीत वाढ करण्याच्या दृष्टिने पावले उचलण्यात येणार आहेत.
बेळगाव तालुक्मयात मार्च 2021 पर्यंत या 42 तलावांची खोदाई करून ते नागरिकांच्या उपयोगात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. मच्छे येथील वनविभागाच्या कार्यक्षेत्रात येणाऱया सात तलावांची खोदाई उद्योग खात्रीतून करण्यात येत आहे. सुमारे 600 हून अधिक कामगारांना काम देण्यात येत आहे. त्यामुळे अनेकांना रोजगारही मिळत असून पाणीपातळीत वाढ करण्यासाठी हे मोठे पाऊल आहे. केंद्र सरकारने पाणी अडवा आणि पाणी जिरवा ही योजना राबविली होती. मात्र याकडे अधिकारी आणि नागरिकांच्या असहकार्यामुळे ही योजना बारगळली आहे.
तलावांची निर्मिती माती आणि दगडाने
एखादे धरण अथवा तलाव निर्माण करण्यास सरकारचा निधी मोठय़ा प्रमाणात खर्च होतो. त्यामुळे तलावांची निर्मिती माती आणि दगडाने करण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरवून कलादगी यांनी कामाला सुरुवात केली. मच्छे येथील सात तलावांची निर्मिती करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. पाणी समस्या आणि शेतकऱयांना त्याचा लाभ करुन देण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. तालुका पंचायत आणि उद्योग खात्रीतून या तलावांना बळकटी देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
बेळगाव तालुक्मयात ज्या ज्या ठिकाणी डोंगराळ भाग आहे आणि त्यामधून जे पाणी वाया जाणार आहे ते अडवून ते जमिनीत जिरविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. बेळगाव तालुक्मयातील बऱयाच ठिकाणी हा प्रकल्प राबविण्यासाठी अधिकाऱयांना सूचना करण्यात आल्या आहेत.
डोंगराळ भागात मोठय़ा प्रमाणात पाणी
बेळगाव तालुक्मयातील डोंगराळ भागामध्ये मोठय़ा प्रमाणात पाणी वाया जात आहे. हेच पाणी जर शेतकरी व नागरिकांच्या उपयोगात आले तर मोठी समस्या मिटणार आहे. त्यामुळेच हे प्रयत्न सुरू आहेत. मच्छे येथे नुकतीच पाहणी करुन येथील कामांची प्रशंसा करण्यात आली आहे. यावेळी जिल्हा पंचायत सेपेटरी एस. बी. मुळळ्ळी, तालुका पंचायत सहाय्यक सचिव राजेंद्र मोरबद, तांत्रिक संयोजक नागराज यरगुद्री, तांत्रिक सहाय्यक बसवराज होसमनी, पीडीओ वासुदेव ऐर्कीक यांच्यासह आदी उपस्थित होते.
उद्योग खात्री कामगारांशी साधला संवाद
जिल्हा पंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही. यांनी उद्योग खात्री कामगारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या. याचबरोबर कामाची पाहणी करुन कामगारांना कोणता त्रास जाणवतो का? याची माहिती करुन घेतली. यावेळी कामगारांनी कोणताच त्रास नसल्याचे सांगताच त्यांनी प्रशंसा केली.