अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा : शिरगुप्पी येथे ऊस उत्पादकांची बैठक
वार्ताहर / शिरगुप्पी
पुढील महिन्यात सुरू होणाऱया सन 2021-22 गळीत हंगामाला सुरुवात करण्याआधी साखर कारखान्यांनी दर घोषित करावा. तसेच एकरकमी एफआरपी देण्यात यावी. अन्यथा ऊस उत्पादक शेतकऱयांकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी नेते सुरेश चौगुले यांनी दिला. ते शिरगुप्पी (ता. कागवाड) येथील गणपती मंदिर सभागृहात झालेल्या ऊस उत्पादक शेतकऱयांच्या बैठकीत बोलत होते.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्ये÷ शेतकरी तमन्ना तम्मदड्डी होते. यावेळी सुरेश चौगुले म्हणाले, येत्या हंगामात साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांना एकरकमी एफआरपी अदा करावी. तसेच बेळगाव येथे साखर आयुक्तांचे कार्यालय सुरू करावे. हंगाम सुरू होण्यापूर्वी दर घोषित करावा, अशा मागण्या केल्या.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आदिनाथ हिमगिरे म्हणाले, गुजरात राज्यामध्ये उसाला प्रतिटन 4600 दर आहे. मात्र कर्नाटक आणि महाराष्ट्रात कमी रिकव्हरी दाखवून वजनकाटे मारून साखर कारखाने कमी दर देत आहेत. यंदा महापुरामुळे उसाचे मोठे नुकसान झाले असून अधिकाधिक दर मिळण्यासाठी आंदोलन करणे गरजेचे आहे.
यावेळी ऐनापूर उस उत्पादक संघटनेचे नेते राजेंद्र पोतदार, अभय कुमार अकिवाटे, सुनील पाटील, अण्णासाहेब आवटी, फुलारे मामा, सिद्धराम हुंडेकर , विजय आकिवाटे, अप्पासाहेब कुरुंदवाडे, राजेंद्र चौगुले, भीमू अकिवाटे, प्रकाश हिमगिरे यांच्यासह अथणी, चिकोडी, कागवाड तालुक्मयातील शेतकरी उपस्थित होते.