चोरून घेऊन जातात लोक
चीनच्या दक्षिण पश्चिम प्रांतात गिझोउ प्रांतात एक अनोखा खडक आहे. हा खडक दर तीस वर्षांनी अंडी (फक्त आकाराच्या स्वरुपात) देतो. अंडय़ासारखा आकारातील हा प्रकार खाली कोसळत असतो. चीनमधील हा रहस्यमय खडक अत्यंत चर्चेत आहे.
आतापर्यंत तुम्ही कोंबडी आणि बदक अंडी देत असल्याचे ऐकले असेल. परंतु चीनमधील हा खडकच अंडी देतो आणि ती देखील तीन वर्षांमध्ये एकदाच. अंडय़ासारखा खडकातील आकार आपोआप त्याच्यापासून वेगळा होतो. खडकाची उंची सुमारे 19 फूट असून तो 65 फूट लांब आहे.
काळय़ा रंगाची अंडी
चीनच्या या रहस्यमय खडकाला ‘चन दन’ या नावाने ओळखले जाते. हा पूर्ण खडक काळय़ा रंगाचा आहे. यामुळे खडकाची अंडीही काळय़ा रंगाची आहेत. खडकाचा भाग आपोआप बाहेरच्या दिशेने येऊ लागतो, त्यानंतर तो खाली पडतो. वैज्ञानिक देखील या पूर्ण प्रक्रियेला समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु यामागील रहस्याचा उलगडा त्यांना करता आलेला नाही.
चोरी होण्याचा प्रकार
चन दन या नावाचा अर्थ अंडी देणारा खडक असा आहे. खडकातून निघणारी अंडी लोक आनंदाचे प्रतीक मानतात. याचमुळे ही अंडी जमिनीवर पडताच लोक ती घेऊन जातात. ही अंडी काळय़ा रंगाची आणि थंड तापमानाची असतात. अंडय़ाचे हे रहस्य सोडविण्याचा प्रयत्न वैज्ञानिक अनेक वर्षांपासून करत आहेत. भूवैज्ञानिकांनुसार हा खडक सुमारे 500 दशलक्ष वर्षे जुना आहे. इतक्या वर्षांपासून हा खडक सर्वप्रकारचे तापमान झेलत आहे.