मालवण/ प्रतिनिधी –
अनुसूचित जाती उद्योजकांसाठी काम करणारी दलित चेंबर ऑफ कॉमर्स (डिकी)संस्थेची सभा प्रहार भवन कणकवली येथे संपन्न झाली. संस्थापकीय अध्यक्ष पद्मश्री डॉक्टर मिलिंद कांबळे तसेच राष्ट्रीय अध्यक्ष पद्मश्री रविकुमार नारा महाराष्ट्राचे अध्यक्ष मा.संतोष कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.यावेळी पद्मश्री रविकुमार नारा यांनी विजय केनवडेकर यांना कोकण विभाग अध्यक्ष म्हणून जाहीर करून पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.
बाबासाहेब आंबेडकर यांच्या आर्थिक धोरणानुसार डीकी ही संस्था देशभरात काम करत असून अनुसूचित जाती जमातीतील उद्योजकांना सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी हा चेंबर काम करीत आहे.देशाचा आर्थिक विकास सर्वसामान्य नागरिकांकडून झाला पाहिजे. सर्व स्तरातील उद्योजकांचा आर्थिक उद्धार झाला पाहिजे या विचाराने माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेगवेगळ्या योजना अनुसूचित जमाती साठी उपलब्ध केले आहेत.त्याचा फायदा सर्वसामान्य उद्योजकाला मिळण्यासाठी डीकी ही संस्था काम करत आहे.यात कोकणवासीय उद्योजकांना सहभागी करून घेण्यासाठी कोकणाची जबाबदारी विजय केनवडेकर यांच्याकडे अध्यक्षपद देऊन सोपवण्यात आली आहे.तसेच लघु सुक्ष्म मध्यम उद्योगांमध्ये माननीय नारायण राणे केंद्रीय कॅबिनेट मंत्री यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उद्योजकांना उद्योग उभा करण्यासाठी जी संधी उपलब्ध करून दिली आहे.याची माहिती व प्रसारण करण्यासाठी उद्योजकांना लाभ मिळवून देण्यासाठी ही संस्था काम करणार आहे.