वारणानगर / प्रतिनिधी
कोल्हापुरामधील तालुका पन्हाळा येथील अशोकराव गायकवाड़ या़ंची ‘दलित महासंघा’च्या कोल्हापुर जिल्हा संघटकपदी निवड करण्यात आली.
दलित महासंघाचे अध्यक्ष प्रा. डॉ. मच्छिद्र संकटे यांनी गायकवाड यांना निवडीचे पत्र दिले यावेळी जिल्हा अध्यक्ष बाबासो दबडे, गणेश धनवडे, संत़ोष बनसोडे, रंगनाथ पांढरबले ,आप्पासो कांबळे, संभाजी पाटोले, बाबासाहेब अवघडे व पदाधिकारी उपस्थित होते.
अशोक गायकवाड यांनी ‘दलित एकता आंदोलन’ ही संघटना दलित महासंघामध्ये विलीन केल्याची घोषणा यावेळी केली यानतंर त्यांची या संघटनेत निवड करण्यात आली.