वार्ताहर/ जमखंडी
जमखंडी तालुक्मयातील आलगूर येथे दलित युवकाच्या मृत्यूचा तपास त्वरित करून गुन्हेगारांना कठोर शिक्षा द्यावी, या मागणीचे निवेदन तालुका दलित संघर्ष समितीने तहसीलदार एस. बी. इंगळे यांना दिले.
आलगूर येथील युवक कल्लाप्पा धर्माण्णा मांग (वय 21) मुधोळ तालुक्मयातील महालिंगपूर येथील चोरी प्रकरणी जमखंडी उपकारागृहात शिक्षा भोगत होता. कल्लाप्पा मांग याला छातीत दुखू लागल्याने त्याला येथील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले. अधिक उपचाराकरिता जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. पण कारागृहाच्या अधिकाऱयांनी त्याला जिल्हा कारागृहात हलविले व तिथेच त्याचा मृत्यू झाला असून याची चौकशी सीबीआयकडून करून याला कारणीभूत असलेल्यांविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी गृहमंत्री बसवराज बोम्माई यांना लिहिलेल्या निवेदनात करून निवेदनपत्र जमखंडी तहसील कार्यालयात सुपूर्द करण्यात आले.
राज्य दलित संघर्ष समिती जिल्हा संघटना संचालक मुत्तण्णा मेत्री, चंद्रू हरिजन, प्रभाकर बजंत्री, मारुती मादर, यशवंत कलुती, सुरेश कांबळे, शिवू शिंगे, बसवराज जमखंडी, संजू पुजारी, नागू मिशी, रमेश पुजारी, नवीन कडकोळ, सिद्दू ममदापूर, परशुराम कट्टीमनी, मल्लू शेषगिरी, प्रकाश हुग्गेन्नवर, कुमार गणी आदी उपस्थित होते.