प्रतिनिधी / पणजी
दशरथ परब यांनी इन्स्टिटय़ूट मिनेझिस ब्रागांझा संस्थेच्या चेअरमनपदाचा ताबा सोमवारी सकाळी घेतला.
मावळते अध्यक्ष संजय हरमलकर यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले आणि त्यांना नव्या जबाबदारी बद्दल शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेचे सदस्य सचिव प्रताप गावकर हेही उपस्थित होते. तसेच संस्थेचे सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. त्यांनी परब यांना शुभेच्छा दिल्या.
पदभार सांभाळल्यानंतर परब यांनी तेथील कारभार जाणून घेतला. त्यानंतर दुपारी त्यांनी मुख्य़मंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली असता मुख्यमंत्र्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच संपूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले.