प्रतिनिधी / बांदा:
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शंभर दशावतार नाट्यमंडळे कार्यरत असून त्यात सुमारे दोन हजार कलाकाराचा समावेश आहे. गेली दोन वर्षे कोरोनामुळे दशावतारीे लोककला सादर करता आली नाही.त्यामुळे बहुतांशी कलाकार व त्यांच्या कुटुंबियांची उपासमार होत आहे. राज्याच्या काही ठिकाणी कोरोना रुग्ण संख्या कमी आहे तिथे मर्यादित स्वरूपाचे सांस्कृतिक कार्यक्रम होत आहेत. तरी आपण आमच्या दशावतारी कलाकारांच्या परिस्थितीचा गांभीर्यपूर्वक विचार करून आम्हांला घटस्थापनेपासून कला सादर करण्यास परवानगी द्यावी. कोरोना बाबत आवश्यक ते नियम पाळून आम्ही कला सादर करू असे लेखी निवेदन सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांना दशावतारी लोककला चालक मालक बहुउद्देशीय संघाच्या वतीने देण्यात आले.यावेळी एम के गावडे, अध्यक्ष तुषार नाईक, सचिव सचिन पालव, देवेंद्र नाईक आदी संघाचे पदाधिकारी उपस्थित होते