क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
शिमोगा येथे कर्नाटक राज्यस्तरीय दसरा कराटे स्पर्धेत बेळगाव जिल्हा स्पोर्ट्स कराटे संघटनेच्या कराटेपटुंनी 15 सुवर्ण, 12 रौप्य व 9 कांस्य पदकासह घवघवीत यश संपादन केले.
नेहरू इनडोअर स्टेडियमवर 10 ते 11 ऑक्टोबर दरम्यान घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय दसरा कराटे स्पर्धेत राज्यातून जवळपास 500 हून अधिक कराटेपटूंनी भाग घेतला होता. 11 वर्षा खालील मुला मुलींच्या गटात आयेशा रेवणकरने 30 किलो गटात सुवर्ण, ओवी सुळेभावीने 24 किलोगटात सुवर्ण संस्कृती काकतीकरने 30 किलो गटात रौप्य, आदित्य अवाडकरने 30 किलो गटात सुवर्ण, गणेश पाटीलने 24 किलो गटात रौप्य, रूद्रा भोसले 30 किलो गटात कांस्य, स्वयं महागावकरने 30 किलो गटात सुवर्ण पदक पटकाविले.
14 वर्षाखालील मुला मुलींच्या गटात युवराज मगदुमने 30 किलो गटात रौप्य, पृथ्वीराज मसरनकरने 30 किलो गटात सुवर्ण, किशन तेग्गीनगेरीने 60 किलो वजनीगटात सुवर्ण, साही मुंगारेने 50 कि. गटात सुवर्ण, रणवीर बेळगावकरने 40 कि. गटात रौप्य, अलिया बेपारीने 30 कि. गटात रौप्य, प्रिया कोलेकरने 38 कि. गटात कांस्य, शुभश्री मिराशीने 46 कि. गटात कांस्य, सिद्धार्थ मोदगीने 25 कि. गटात सुवर्ण, आदित तलवारने 50 कि. गटात कांस्य, साईश कुडचीने 50 कि. गटात रौप्य, समृद्धी सडेकरने 34 कि. गटात सुवर्ण, अमर चौगुलेने 30 कि. गटात कांस्य पदक पटकाविले.
17 वर्षाखालील मुला मुलींच्या गटात निलेश बिर्जेने 35 कि. गटात सुवर्ण, सुनिधी कणबरकरने 40 कि. गटात रौप्य, संजना शिंदेने 45 कि. गटात कांस्य, कपिल चौगुलेने 45 कि. गटात रौप्य, रितु पाटीलने 56 कि. वजनी गटात रौप्य, ओंकार पाटीलने 78 कि. गटात सुवर्ण, जयकुमार मिश्राने 35 कि. गटात रौप्य, राहुल कोलेकरने 30 कि. गटात सुवर्ण, सिद्धार्थ ताशिलदारने 35 कि. गटात कांस्य, निधी गावडेने 44 कि. गटात सुवर्ण, काव्या बडिगेरने 50 कि. गटात कांस्य पदक पटकाविले.
19 वर्षाखाली मुला मुलींच्या गटात मुस्कार वादवानी ने 56 कि. गटात सुवर्ण, सौरभ मजुकर 60 कि. गटात सुवर्ण, इसरील याद्दनपुडीने 50 कि. गटात कांस्य, ऋषिकेश सनदीने 60 कि. गटात रौप्य, तर ओंकार रावलने 60 कि. गटात रौप्य पदक पटकाविले.
स्पर्धेनंतर प्रमुख पाहुणे शिमोगाचे महापौर शाहिन अल्ताफ पिसाजी, सुनिता आण्णाप्पा यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पदके, प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. कराटे मास्टर गजेंद्र काकतीकर, जितेंद्र काकतीकर, रमेश अलगुडगेकर, परशराम काकती, विठ्ठल भोजगार, प्रभाकर किल्लेकर, आक्षय परमोजी, निलेश गुराखा, हरिष सोनार, नताशा अष्टेकर व विनायक दांडेकर आदी उपस्थित होते.