अनिल बेनके-देवस्थान कमिटीकडून निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
दसऱयाची पालखी आणि 9 ऑक्टोबर रोजी होणाऱया सिमोल्लंघन कार्यक्रमाची वेळ वाढवून देण्याच्या मागणी जिल्हाधिकारी एम. जी हिरेमठ व बेळगाव पोलिस कमिशनर यांच्याकडे आमदार अनिल बेनकेसह महामंडळाच्या सदस्यांनी भेट देऊन निवेदन दिले.
दरवर्षीप्रमाणे ऐतिहासिक सुप्रसिद्ध दसरा महोत्सव व पालखी उत्सव, कॅम्पमधील देवी रथोत्सव, सिमोल्लंघन कार्यक्रमाला दरवर्षीप्रमाणे यावर्षीही साजरा करण्यासाठी बेळगाव देवस्थान कमिटी, पालखी कमिटी,
तसेच कॅम्प येथील 5 देवतांचे रथोत्सव कोविड नियमांचे पालन करून हा सण साजरा करण्यासाठी आधिच्या वेळेपेक्षा वेळ वाढवून द्यावा, असा विनंतीपूर्वक आग्रहाचे निवेदन जिल्हाधिकारी व पोलिस कमिशनरला देऊन विचार मांडले.
या संदर्भात रणजित चव्हाण- पाटील, सुनिल जाधव, लक्ष्मण किल्लेकर, कॅम्प मंडळाचे पदाधिकारी, देवस्थान कमिटीचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.