वार्ताहर/ किणये
दसरा उत्सवासाठी ग्रामीण भागातील मुख्य बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाली होती. तालुक्याच्या बहुतांशी भागात शनिवारी सायंकाळी खंडेनवमीची पूजा करण्यात आली. रविवारी बहुतांश गावांमध्ये सीमोल्लंघनाचा कार्यक्रम साध्या पद्धतीने होणार आहे.
दसरोत्सवासाठी लागणाऱया पूजेच्या साहित्याची तसेच फूल, हारांची खरेदी करताना नागरिक दिसत होते. फुले व हारांच्या किमतीत मोठय़ा प्रमाणात वाढ झालेली आहे. 40 ते 50 रुपयाप्रमाणे पाच उसाची किमतीने खरेदी करण्यात येत होती.
रविवारी या नवरात्रोत्सवाची सांगता होणार आहे. बऱयाच गावांमध्ये सीमोल्लंघन मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात येतो. मात्र यंदा कोरोनामुळे साध्या पद्धतीने हा उत्सव साजरा करण्याचा निर्णय देवस्थान पंच कमिटीच्यावतीने घेण्यात आला आहे..