बेळगाव :/ प्रतिनिधी
खडे नवमी व दसऱया सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारात खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी वाढू लागली आहे. दसऱयाच्या पूजेसाठी लागणाऱया साहित्यांनी बाजारपेठ बहरली आहे. त्याबरोबरच पूजेसाठी लागणारे ऊस देखील बाजारात विक्रीसाठी दाखल झाले असून शहराच्या विविध ठिकाणी ऊसाची विक्री होताना दिसून येत आहे.
दसरा व दिवाळी सणासाठी मोठय़ा प्रमाणात पूजेसाठी ऊसाची मागणी असते. रविवारी दसरा असल्याने शहरातील काकतीवेस, यंदे खुट, समादेवी गल्ली आदी ठिकाणी ऊसाची विक्री होताना दिसत आहे. साधारण 80 रुपयाला पाच (नग) ऊस दिले जात आहेत. परतीच्या पावसामुळे शेतातून ऊस बाजारात आणेपर्यंत अधिक कष्ट घ्यावे लागत आहेत. परतीच्या पावसाने शिवारात पाणी साचल्याने ऊस तोडून आणणे कठीण होत असल्याचे विपेत्यांनी सांगितले.