10 जिल्हय़ांमधील 56 ठिकाणांवर ‘एनआयए’कडून छापे
श्रीनगर / वृत्तसंस्था
जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रीय सुरक्षा तपास यंत्रणेने (एनआयए) आतापर्यंतची मोठी कारवाई केली आहे. दहशतवादी संघटनांना निधी पुरवठा केल्याप्रकरणी ‘एनआयए’ने जम्मू काश्मीरमधील दहा जिल्हय़ांमध्ये धाड टाकली आहे. जम्मू काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफच्या मदतीने दिवसभरात एकूण 56 ठिकाणांवर एकाचवेळी छापे टाकण्यात आले. जमात-ए-इस्लामीच्या (जेएई) सदस्यांच्या ठिकाणांवर हे छापासत्र टाकण्यात आल्याची माहिती प्रवक्त्याकडून देण्यात आली. तसेच काही संशयास्पद कागदपत्रे आणि संगणक, मोबाईल, लॅपटॉप अशा वस्तूही जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात आले. तथापि, अद्याप चौकशीत काय समोर आले याबाबत सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही.
पाकिस्तानला तसेच फुटीरतावाद्यांना समर्थन करणाऱया जमात-ए-इस्लामी संघटनेवर केंद्र सरकारने 2019 मध्ये बंदी घातली आहे. बंदी असतानाही जमात-ए-इस्लामीकडून सुरु असलेल्या कारवाया रोखण्यासाठी ‘एनआयए’कडून हे छापे टाकण्यात आले. या कारवाईसाठी दिल्लीमधून वरि÷ अधिकारी आणि त्यांची टीम मध्यरात्रीच श्रीनगरला दाखल झाली होती. त्यानंतर सकाळपासूनच जम्मू काश्मीरमधील अनेक जिल्हय़ांमध्ये धाडसत्र सुरु झाले.
दहशतवादी संघटना ‘जमात-ए-इस्लामी’च्या ज्ये÷ सदस्यांशी दहशतवादविरोधी चौकशी यंत्रणा अर्थपुरवठय़ासंबंधी विचारणा करत होती. या चौकशीच्या निमित्ताने जवळपास 56 ठिकाणी छापे टाकण्यात आले. रामबन, किश्तवार, दोडा, राजौरी या जिल्हय़ांमध्ये सर्वाधिक ठिकाणी छापे पडले आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत याबाबतची चौकशी सुरू होती. यापूर्वी गेल्या काही दिवसात वेगवेगळय़ा प्रकरणात छापे टाकत ‘एनआयए’ने काही लोकांना अटकही केली आहे. ‘जमात-ए-इस्लामी’ या संघटनेवर केंद्र सरकारकडून फेबुवारी 2019 मध्ये बंदी घालण्यात आली होती. पाकिस्तानशी लागेबांधे असल्याचे उघड झाल्यानंतर संघटनेवर बंदी घातली असली तरी छुप्या पद्धतीने काही संशयितांकडून कारनामे सुरूच होते.